मा. राष्ट्रीय नेते डॉ. राजेन्द्रजी गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 26/12/25 रोजी मुंबईला रि.पा.ई.पक्षाच्या कार्यालयामध्ये बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी श्री मनोज बागडे यांची नियुक्ती मा. राष्ट्रीय नेते डा. राजेन्द्रजी गवई यांच्या हस्ते करण्यात आली. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 26 December 2025

मा. राष्ट्रीय नेते डॉ. राजेन्द्रजी गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 26/12/25 रोजी मुंबईला रि.पा.ई.पक्षाच्या कार्यालयामध्ये बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी श्री मनोज बागडे यांची नियुक्ती मा. राष्ट्रीय नेते डा. राजेन्द्रजी गवई यांच्या हस्ते करण्यात आली.

 



मा. राष्ट्रीय नेते डॉ. राजेन्द्रजी गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 26/12/25 रोजी मुंबईला रि.पा.ई.पक्षाच्या  कार्यालयामध्ये बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी श्री मनोज बागडे यांची  नियुक्ती मा. राष्ट्रीय नेते डा. राजेन्द्रजी गवई यांच्या हस्ते करण्यात आली.

मुंबई - (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ) दि. 26/12/25- आज रोजी मुंबईला रि.पा.ई. चे राष्ट्रीय नेते डॉ. राजेन्द्रजी गवई साहेब यांच्या हस्ते शेगावचे मनोज बागडे यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी त्यांचा शॉल आणि नियुक्तीपत्र देऊण त्यांच्या सम्मान करण्यात आला .यावेळी म.राज्य कार्याध्यक्ष जलीलखान यांचा सुद्धा राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्रजी गवई साहेब यांनी सत्कार केला.

 यावेळी  म.राज्य उपाध्यक्ष बबनरावजी शिंदे, म.राज्य कार्याध्यक्ष जलील खान मो. खान (अल्पसंख्याक सेल म.राज्य), आनंदजी खरात, अध्यक्ष मुंबई प्रदेश, राज मकानकर कोल्हापुर शहर अध्यक्ष, हेमंत भोसले प्रभारी सातारा, सांगली, अविनाश सावदे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापुर, विलास भास्करराव बर्वे, तसेच अनेक कार्यकर्तें  हजर होते.

मा. राष्ट्रीय नेते डॉ. राजेन्द्रजी गवई साहेब यांनी बोलतांना बुलढाणा जिल्हातील रि.पा.ई च्या सर्व कार्यकर्ताना संबोधीत  केले कि मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी शेगावचे मनोज  बागडे यांची  नियुक्ती केल्यामुळे त्यांच्याशी संपर्कात राहुण संपूर्ण जिल्ह्याची कार्यकारीणी करीता त्यांना सहकार्य करावे. आपले जिल्हाध्यक्ष यांना छोटे मोठे सर्व कार्यकर्ते सगळ्याच्या वतीने सहकार्य करण्यात यावे आपले रि.पा.ई चे राष्ट्रीय नेते डॉ . राजेन्द्रजी गवई साहेब.