*ग्रामसभेत भ्रष्टाचार उघड करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण* *कुरणगाड येथे ग्रामसभेत सरपंचाचा गुंडगिरीचा कहर! - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 28 February 2026

*ग्रामसभेत भ्रष्टाचार उघड करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण* *कुरणगाड येथे ग्रामसभेत सरपंचाचा गुंडगिरीचा कहर!

 




ग्रामसभेत भ्रष्टाचार उघड करणाऱ्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण*

*कुरणगाड येथे ग्रामसभेत सरपंचाचा गुंडगिरीचा कहर!

भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२), ३५२, ३(५) अन्वये  गुन्हे दाखल


जळगाव जामोद

कुरणगाड बु गावातील ग्रामसभा बैठकीदरम्यान सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांकडून किशोर नारायण भारसाकळे या ग्रामस्थाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 ग्रामसभेत गावातील विकासकामे, निधी खर्च व घरकुल योजनेबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. प्रश्न विचारल्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच भारत बाबुराव आठवले, त्यांचे वडील बाबुराव मरी आठवले आणि त्यांचे जावई योगेश अंदुरकार ह्या तीन व्यक्तीनी व कुटुंबीयांनी संबंधित तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, आणि ही मारहाण ग्रामसभा चालू असताना केली आहे. असा व्हिडीओ समोर आला आहे. सदर घटना दि. 25/02/2026 रोजी कुरणगाड बु. गावात घडली. ही ग्रामसभा 26 जानेवारी रोजी घेतली नसल्याने गटविकास अधिकारी जळगाव जामोद यांना वारंवार निवेदन देऊन तक्रार देऊन ही ग्रामसभा आयोजित केल्या गेली होती. समस्त गावकरी लोकांची मागणी होती की ग्रामनिधीचा हिशोब द्यावा. या घटनेमुळे ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर प्रकरणाबाबत किशोर भारसाकळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.

सदर आरोपी सरपंच भारत बाबुराव आठवले, बाबुराव मरि आठवले, भिमराव, सुखदेव आठवले, आणि योगेश विजय अंदूरकार यांच्या वर भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२), ३५२, ३(५) अन्वये यांच्यावर उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. ग्रामसभेसारख्या लोकशाही मंचावरच जर नागरिकांवर हल्ला होत असेल, तर सामान्य जनतेने न्याय कुठे मागायचा? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. किशोर नारायण भारसाकळे यांनी ग्रामपंचायत चा भ्रष्टाचार उघडा करण्यासाठीचा लढा चालू असतांना त्याला सरपंच कुटुंबियाकडून जिवे मारण्याची धमकी देत, तुला भोकसून काढू अश्या आक्रमक भाषेत धमकी दिली आहे.


ग्रामसभा चालू असताना एका ही प्रश्नाचे  उत्तर दिले नाही, आणि रमाई घरकुल योजने मधील घोटाळा बाहेर केल्या गेला आहे. सरपंच भारत बाबुराव आठवले यांनी स्वतः च्या वडीलांचे घरकुल, आणि स्वतः चे घरकुल, तसेच त्यांच्या आत्याचे घरकुल आणि, काकाचे घरकुल पास करून दिले. शासकीय नियमांची पायामाल्ली करून हे कृत केल्या गेले आहे. कोणत्याही प्रकारची पाहणी करता त्यांना घरकुल न बांधता पैसे दिल्या गेले. तसेच कोणत्याही कागदपत्राची पाहणी न करता स्वतःच्या घरातील घरकुल पास करून गरीब लाभार्थी यांच्या हक्कावर अतिक्रम केल्या गेले.

किशोर नारायण भारसाकळे यांनी भ्रष्टाचार बाहेर काढला असता सूळ बुद्धी पोटी, आणि द्वेषा पोटी त्यांच्यावर मारहाण केल्या गेली. तुझे गावात एकटे घर आहे, आमचे पूर्ण गाव आहे, असे बोलून त्याला दडपशाही मध्ये ठेवून मारहाण केल्या गेली, त्यासाठी समस्त गावकरी यांचा “आरोप आहे कीं “कथित “निष्पक्ष चौकशी व्हावी”ग्रामसेवक यांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर रमाई घरकुल आवास योजने च्या घरकुल ची रिकव्हरी केल्या जाईल.