रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ बागडे यांनी तालुकाध्यक्ष खामगाव तसेच तालुकाध्यक्ष संग्रामपूर यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया , बुलढाणा जिल्ह्याची सभा शेगाव येथे संपत्र..
शेगाव - दि. 09-06-2026.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. श्री. मनोज भाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली शेगाव विश्रामगृहला खामगाव तालुकाध्यक्ष तसेच संग्रामपूर तालुकाध्यक्ष यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष श्री. अनिल भाऊ पाटील आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. खामगाव तालुका अध्यक्षपदी श्री. प्रमोद उत्तमराव शेगावकर यांची नियुक्ती करण्यात आली तसेच श्री. अशोक नागोराव इंगळे यांची संग्रामपूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी दोन्ही तालुकाध्यक्ष यांचे पुष्पहार तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शेगाव विश्राम गृह येथे समाजातील अनेक मान्यवर तसेच इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.
