महादेव जानकर साहेब यांच्या वर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रीय समाज पक्ष मध्ये प्रवेश–
सिंदखेडराजा -
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघा देऊळगाव राजा तालुका मध्ये देऊळगाव मही येथे शुक्रवारी दिनांक 14 आगस्ट 2026रोजी झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या युवा जोडो संकल्पन अभियान या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ भुसारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा उपाध्यक्ष संतोष वनवे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस/ शरद पवार गट/ काँग्रेस शिवसेना पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ भुसारी पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशात
श्री. कारभारी देढे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष बुलढाणा
ज्ञानेश्वर गायकवाड युवा आघाडी
तालुकाध्यक्ष देऊळगाव राजा, यांची नियुक्ती करण्यात आली आहे
अमोल शिंगणे शिवाजी शिंगणे सुनील पाटील किशोर शिंगणे
प्रकाश नांगरे अशोक वाघमारे शिवानंद देवखाने विजयानंद बोर्ड किसन दहातोंडे
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय महादेव जानकर साहेब विकासाभिमुख विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष ला संघटनेला नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे राष्ट्रीय समाज पक्ष चा परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
माजी मंत्री आदरणीय महादेव जानकर साहेब तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अजित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास, जनसेवा आणि संघटन विस्ताराचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्ष संघटना अधिक मजबूत करून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धारही करण्यात आला.
