शेगाव - 15 ऑगस्ट 2026 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारिनी शेगावला जिल्हा कार्यालयात तसेच जनसंपर्क कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष ॲड.श्री.मनोज बागडे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा केला.
यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ॲड.श्री. मनोज बागडे , शेगाव तालुकाध्यक्ष श्री. शशिकांतजी दाभाडे,बुलढाणा तालुकाध्यक्ष श्री. रवि तायडे, जळगांव जामोद तालुकाध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी शहाणे साहेब , शेगाव तालुका सचिव श्री. गजानन चितोडे व ईतर सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी कराओके क्लब च्या वतीने राष्ट्रगीते म्हणण्यात आले आणि सर्वांनी सहभागी होऊन स्वतंत्रता दिवस आनंदाने साजरा केला.
.jpg)
