रि.पा.ई चे जिल्हाध्यक्षपदी मनोज बागडे यांची नियुक्ती होताच रि.पा.ई चे माझी जिल्हा उपाध्यक्ष यांनी शेगांवला गुलदस्ता देऊन केला त्यांचा सत्कार.
शेंगाव दि 30/12/25 -
मा. राष्ट्रीय नेते डॉ. राजेन्द्रजी गवई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 26/12/25 रोजी मुंबईला रि.पा.ई.पक्षाच्या कार्यालयामध्ये बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी श्री मनोज बागडे यांची नियुक्ती मा. राष्ट्रीय नेते डॉ . राजेन्द्रजी गवई यांच्या हस्ते करण्यात आली त्यामुळे समाजातले अनेक बांधव कळुन त्यांचा गुलदस्ता देऊन सत्कार आणि स्वागत करण्यात येत आहे.
माझी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पानपाटील आणि सुपाजी इगळे यांनी मनोज बागडे यांची भेट घेऊन त्यांचा गुलदस्ता देऊन सत्कार केला आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी पक्षाची कार्यकारिणी आणि पुढील रणनीती वर चर्चा केली.
